अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात, वेगवेगळ्या मुद्यांवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीति
मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra assembly Budget Session 2021 Live) आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे. विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेनेचे काल मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. सरकारला कामकाज करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
Tags :
Legislative Assembly Session Financial Budget Maharashtra Budget Mahavikas Aghadi Legislative Council Corona