Dombivali : मैत्रिणीनंच केली मैत्रिणीची हत्या, डोंबिवलीत एकट्या राहणाऱ्या वृद्धेची हत्या
abp majha web team
Updated at:
19 Jan 2022 12:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंबिवलीतील टिळक नगर परिसरात एका वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. विजया बाविस्कर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून त्या ५८ वर्षाच्या होत्या. आनंद शीला या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विजया बाविस्कर या एकट्याच राहत असत. आज सकाळी धुणीभांडी करणारी महिला आली असता त्यांना विजया यांचा मृतदेह आढळून आला. टिळक नगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करताहेत. दरम्यान विजया बाविस्कर यांची हत्या कोणत्या उद्देशातून करण्यात आली याचा छडा लावण्याचं आव्हान डोंबिवली पोलिसांसमोर असणार आहे.