Mumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 20 सप्टेंबर 2024 :6 pm : ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 20 सप्टेंबर 2024 :6 pm : ABP Majha
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका २२ सप्टेंबरला, २८ उमेदवारांसाठी १३ हजार ४०६ मतदार मतदान करणार, ३८ मतदान केंद्र आणि ६४ बुथवर मतदान, २५ सप्टेंबरला निकाल
सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरेंचं मतदारांना पत्र, २२ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंची युवासेना आणि ABVP मध्ये थेट लढत, भावी पिढ्यांसाठी योग्य निर्णय घ्या, ठाकरेंचं आवाहन. 
दसरा मेळाव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीबाबत ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा पालिकेला स्मरणपत्र,परंतु अद्याप यावर पालिकेने उत्तर न दिल्याने ठाकरे गटाकडून आतापर्यंत तीन स्मरणपत्र देण्यात आली
भाजप नेते मोहीत कंबोज यांची संजय पांडेंवर टीका, सुपारीबाज अधिकारी म्हणत, भाजप नेत्यांवर खोट्या केसेस टाकल्याचाही कंबोज यांचा आरोप. 
दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरेंकडून निवड, मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हीटी अँड आर्टचे प्रसाद गवळी यांच्या बोधचिन्हाची अंतिम निवड. 
वाढवण बंदराजवळ मोठं टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी हालचाली, त्यासाठी पालघर जिल्ह्यातील माहीम आणि टोकराळे गावातील बाराशे एकर जमीनीचं भुसंपादन केलं जाणार असल्याची माहिती. 
मागील 6 महिन्यात कोस्टल रोडवरून ४० लाख वाहनांनी केला प्रवास, मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, टोलमुक्त वेगवान प्रवास करता येत असल्यानं, इंधनाची बचत होत असल्यानं मुंबईकरांची या प्रवासाला पसंती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram