Ekvira Devi : आई एकविरा देवीच्या कार्ला गडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात, विधीवत पुजा करून घटस्थापना
abp majha web team
Updated at:
15 Oct 2023 12:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. एकविरा आईच्या मंदिरात विधीवत पुजांसह घटस्थापना करण्यात आली. देवीचा यथोचित साज श्रृंगार देखील आज करण्यात आला. यासाठी मंदिराला आकर्षक फुलांनी सजविण्यात आलं आहे. ही सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. घटस्थापना रविवारी आल्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त कार्ला गड़ावर एकवीरा देविच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. आई एकविरा ही ठाकरे कुटुंबियांची कुलदैवता आहे. तसेच आगरी-कोळी बांधवांचं हे श्रद्धास्थान मानलं जातं.