Dipak Chavan on APMC Election Result : बाजार समित्यांचं शेतकऱ्यांसाठी महत्व काय?

Continues below advertisement

Dipak Chavan on APMC Election Result : बाजार समित्यांचं शेतकऱ्यांसाठी महत्व काय?  

APMC Election 2023 Result : सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Agricultural Produce Market Committee) रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी मतदान प्रक्रिया होऊन निकालही जाहीर झाले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल अद्याप बाकी आहेत. आजही काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय मिळवला आहे.

दरम्यान, या बाजार समित्यांच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. तर बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी गटालाही धक्का बसल्याचे चित्र आहे. 
राहिलेल्या ठिकाणी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे. 

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे, नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भूसे, मंत्री विजयकुमार गावीत, एकनाथ खडसे या सारख्या नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. या नेत्यांच्या पॅनेलचा पराभ झाला आहे. काही ठिकाणी सत्तेसाठी निर्माण झालेल्या अभद्र युत्यांना सुद्धा मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील निकालामध्ये संमिश्र यश उमटलं आहे. विदर्भातील रामटेक, नागपूरमधील सुनिल केदार, आशिष जायस्वाल यांच्या अभद्र युतीला त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या पॅनलने केलेला पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीने बाजी मारली. नगरमध्ये विखे पाटील गटाला बाळासाहेब थोरातांनी धक्का देत भोपळाही फोडू दिला नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram