Bhiwandi Building Collapsed : मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर
Bhiwandi Building Collapsed : मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहाणी, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर
भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे. या घटनेतील जखमींना लवकर आराम मिळावा, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल, असेही त्यांनी सांगितले आहे. बचाव कार्य वेगाने केले जात आहे.