BCCI on Dhoni Jersey : धोनीची सात क्रमांकाची जर्सीही आता BCCI निवृत्त करणार : सूत्र

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या निवृत्तीला साडेतीन वर्षे झालीयत. आणि आता वेळ आलीय तीन धोनीच्या नंबर सात जर्सीच्या निवृत्तीची. होय, तुम्ही ऐकताय, ती बातमी सोळा आणे खरी असल्याची बीसीसीआयमधल्या सूत्रांची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीनं आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्दीत वापरलेली सात क्रमांकाची जर्सीही आता बीसीसीआय निवृत्त करणार आहे. त्याचा अर्थ यापुढच्या काळात सात क्रमांकाची ती जर्सी भारताच्या किंवा आयपीएलमधल्या कोणत्याही खेळाडूला वापरता येणार नाही. याआधी बीसीसीआयनं सचिन तेंडुलकरची दहा क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला होता. त्याआधी शार्दूल ठाकूरनं २०१७ साली आंतरराष्ट्रीय सामन्यात दहा क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. पण स्टेडियममधल्या आणि सोशल मीडियावरच्या क्रिकेटरसिकांनी शार्दूल ठाकूरच्या त्या कृतीवर तीव्र नापसंती दाखवली होती. त्यानंतर बीसीसीआयनं सचिन तेंडुलकरची दहा क्रमांकाची जर्सी निवृत्त केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola