Atul Bhatkhalkar : कोस्टल रोडच्या कामात अनिल देशमुखांना कोट्यवधीचे पेमेंट दिलं गेले - भातखळकर
abp majha web team
Updated at:
11 Feb 2022 04:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे नातेवाईक सत्यजित देशमुख यांच्या कंपनीला शून्य कामाचा अनुभव असताना कोस्टल रोडच्या कामात सब कंत्राटदार म्हणून नेमले गेले. तर 2020-2021 च्या कालावधीत या कंपनीला कोट्यावधीचे पेमेंट केले गेले. कॅगने चार वर्षांपूर्वी या बाबतचे ताशेरे ओढले आहेत. या कंपनीची चौकशी करावी. या कंपनीला कुठल्या अधिकाऱ्याने काम दिले. त्याच्यावर कोणाचा दबाव होता. याची चौकशी करण्यासाठी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र पाठवले आहे. याचसोबत वांद्रे, वर्सोवा- सी लिंक, आणि समृद्धी महामार्गात देखील या कंपनीला गैरमार्गाने काम दिले गेले. असा आरोप अतुल भातखळकर यांनी केलाय.