प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल, तर चंद्रकांत बावणकुळेंच्या काळातील कामाची चौकशी होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2022 12:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष आणि भाजप यांच्यात दिवसेंदिवस वाद वाढत चालला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप द्वारे तपास यंत्रणांचा गैरवापर करत महाविकास आघाडी नेत्यांवर कारवाई केली जातेय असं आघाडी नेत्यांच म्हणणं आहे. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारने ही भाजप नेत्यांविरोधात पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे असं दिसतय. प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरीकडे माजी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावणकुळेंच्या काळातील कामाची चौकशी होणार असल्याचंही समोर आलं आहे.