मुंबईत Narayan Rane तर Nanded मध्ये Sambhajiraje Bhosale यांच्या कार्यक्रमात Corona नियमांची ऐशीतैशी
मुंबईतल्या नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियम, चेहऱ्यावरचे मास्क आणि सामाजिक अंतर पाळण्याचं भान कुणालाही राहिलं नव्हतं. तर अशीच परिस्थिती नांदेडमधील मराठा मूक आंदोलनातही दिसली. संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा मूक आंदोलन आयोजित करण्यात आलं. पण, यावेळी गर्दीकडून होत असलेल्या कोरोना नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी संभाजीराजेंनी गर्दीला खडेबोल सुनावलेत. आणि खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं.