MNS Raj Thackeray : निवडणुकीत फक्त स्त्री आणि पुरुष असच आरक्षण असायला हवं : मनसे अध्यक्ष राज ठाकरे
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं असं विधान केलं होतं. यानंतर शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रबोधनकार वाचा असा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही राज ठाकरे मात्र आपल्या विधानावर कायम आहेत. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी शरद पवारांना उत्तर देत मी प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण दोन्ही वाचले आहेत, असं प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीवर पुन्हा सडकून टीका केली आहे. निवडणुकीत वॉर्डनिहाय फक्त स्त्री आणि पुरुष एवढंच आरक्षण असावं, अशी भूमिका राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत मांडली आहे. काही दिवसांपूर्वी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. या वक्तव्याचा राज ठाकरेंकडून पुनरुच्चार करण्यात आला आहे.