Parbhani : परभणीत राष्ट्रवादी आणि भाजपचे माजी आमदार आमनेसामने, मतदान केंद्रावर फ्रिस्टाईल झटापट

Continues below advertisement

परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. आज औद्योगिक सहकारी संस्थेच्या मतदान केंद्रावर ही झटापट झाली.. या वादामुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण होतं.. औद्योगिक सहकारी संस्थेच्या मतदान केंद्रावर माजी आमदार बोर्डीकर आणि माजी आमदार भांबले यांच्या पॅनलचे टेंट समोरा समोरच होते.त्यावेळी दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला.. मात्र काही वेळानंतर या वादाचं रुपांतर झटापटीत झालं..यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.. दरम्यान, पोलिसांकडून तणावानियंत्रण मिळवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram