सीईटी परीक्षार्थींच्या लोकल प्रवासाबाबात संभ्रम, रेल्वेकडून अद्याप लोकल प्रवासाची परवानगी नाही
Continues below advertisement
उद्यापासून उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना सुरुवात होत आहे. त्यामुळे सीईटी परीक्षेला परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहोचता यावे हा विचार करून विद्यार्थ्यांना आपले हॉल तिकीट दाखवून लोकलमध्ये प्रवासासाठी परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आलीये.
शिवाय, ही परवानगी रेल्वे कडून देण्यात यावी पत्र रेल्वे प्रशासनाला राज्याच्या आपत्ती व पुनर्वसन विभागाकडून 8 सप्टेंबरला पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र अजूनही रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाले नसून अधिकृतरित्या रेल्वेकडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना केंद्रावर जाण्यासाठी लोकल प्रवासासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ज्या परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवास करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना लोकलने हॉल तिकीट दाखवून प्रवास करण्याची मुभा आहे का ? याबाबत काहीसा संभ्रम आहे
Continues below advertisement