Jan Mohammad Shaikh : जान मोहम्मद अली शेखची बातमी बघून आम्हाला सुद्धा धक्का बसला : शेजारी ABP Majha

Terrorist Arrested : दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत. 

स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुमार कुशवाह म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान सपोर्टेड दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दोघांनी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांकडून स्फोटके आणि शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. 

सीपी नीरज ठाकूर म्हणाले की, आज दहशतवादाविरोधातील मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. मल्टीस्टेट ऑपरेशनमध्ये आम्ही सहा जणांना अटक केली आहे. समीर, लाला, जीशान कमर, ओसामा, जान मोहम्मद अली शेख आणि मोहम्मद अबू बकर यांना अटक करण्यात आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे या सहा पैकी दोन जण असे आहेत जे यावर्षी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परतले आहेत. आम्हाला केंद्रीय एजन्सीकडून इनपुट मिळाले होते की भारताच्या काही शहरांमध्ये दहशतवादी घटना घडवण्याचे षड्यंत्र सीमेपलिकडून रचलं जात आहे. ही गुप्त माहिती  लक्षात घेता, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने एक विशेष टीम तयार केली जी डीसीपी प्रमोद कुशवाह यांच्या देखरेखीखाली काम करत होती

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola