Uddhav Thackeray Uncut PC | आधी फाशी द्या, मग तपास करा, असं होऊ शकत नाही : CM उद्धव ठाकरे

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अशातच विधानसभेत मनसुख हिरण प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. तसेच अधिवेशनात मनसुख हिरण प्रकरण खूप गाजलं होतं. अशातच हिरण प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला असून क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आल्याची घोषणाही गृहमंत्र्यांनी केली आहे. 

"सर्वांची गैरसोय झालेली आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशन समाप्त झालं, कोरोनामुळे आव्हानात्मक होतं. पण कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी सहकार्य केलं. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या अर्थसंकल्पावर आज चर्चा झालेली आहे. हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर हे अधिवेशन समाप्त करण्यात आलं असून पुढच्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली आहे. एकूणच गेले 10 दिवस जे काही झालं, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात." असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन संपलं असून कोरोनाच्या संकटात हे अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. विरोधी पक्षानेही उत्तम सहकार्य केलं. यापूर्वी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्ही तुमच्याशी संवाद साधला होता. आताच्या आवाहनात्म परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही." , असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola