
Pune Coronavirus | पुणे शहरातील निर्बंध अधिक कठोर करणार : महापौर मुरलीधर मोहोळ
Continues below advertisement
पुण्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील निर्बंध अधिक कठोर करण्यात येणार आहेत. हॉटेल , रेस्टोरंट्सच्या वेळा, बागा, स्विमिंग पूल तसेच जिमच्या वेळांवर बंधनं आणली जाण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी पालकमंत्र्याच्या उपस्थितीत आढावा बैठक होईल. त्यात याबाबतचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय. पुण्यात मंगळवारी एक हजाराच्या वर रुग्ण आढळून आले. त्याचप्रमाणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजारांवर गेलीय.
Continues below advertisement