CM Eknath Shinde : महिलांनी शिंदेंना ओवाळलं, राखी बांधली; लाडकी बहिण योजनेसाठी मानले आभार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : महिलांनी शिंदेंना ओवाळलं, राखी बांधली; लाडकी बहिण योजनेसाठी मानले आभार राज्यातील महायुती सरकारकडून शुक्रवारी त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.... या अभंगाने अर्थसंकल्पाच्या (Maharashtra Budget 2024) वाचनाला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात आलेल्या महायुतीच्या या अर्थसंकल्पात महिलावर्गाला केंद्रस्थानी ठेवून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील लोक्रपिय मुख्यमंत्री लाडली बहन योजनेच्या धर्तीवर राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबातील महिला आणि तरुणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचे वाटप केले जाईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्य सरकारने महिलांसाठी नेमक्या काय-काय घोषणा केल्या? * राज्यातील महिला विविध क्षेत्रात नेत्रदीपक कमागिरी करत आहेत. परीक्षेतील मुलींची आघाडी हा तर नियमच झाला आहे. त्यामुळे राज्यातील माय-भगिनींना संधीची कवाडे खुली करुन देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी राज्यातील आमच्या लेकी-बहिणींसाठी मी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' घोषित करत आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान केले जातील. या योजनेसाठी अर्थसंकल्पात 46000 कोटींची वार्षिक तरतूद केली जाईल. जून2024 पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होईल.