CM Eknath Shinde : आमची शिवसेना खरी शिवसेना; अखेर सत्याचाच विजय - एकनाथ शिंदे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde : आमची शिवसेना खरी शिवसेना; अखेर सत्याचाच विजय - एकनाथ शिंदे
सत्यमेव जयते हे कालच्या निर्णयाने दाखवून दिलं आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांचा विजय झालाय, जो विश्वास दीड वर्षा पासून माझ्यावर दाखवला त्यासाठी मी धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया आमदार आपत्रतेच्या निर्णयावर (MLA Disqualification Case) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीये. शिवसेना आमची आणि आमच्या विचारांची, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. समोरचे बहुमत असल्याचा कोणाताही पुरावा देऊ शकले नाहीत, तसेच त्यांनी खोटी कागदपत्र दिल्याचं देखील निकालात म्हटलंय.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय देताना पक्ष हा एकनाथ शिंदेंचा असून कोणत्याही गटाचे आमदार अपात्र असल्याचा निकाल दिला. त्यावर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी या निकालाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आभार देखील मानलेत. घराणेशाही हरली असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.