Ramabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णय

Continues below advertisement

Ramabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णय 

घाटकोपर मधील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनविकासासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय  एमएमआरडीएला 25 टक्के जमीन अधिमुल्य भरण्याबाबत सूट देण्यासंदर्भातला होणार निर्णय  एमएमआरडीए आणि एसआरए भागीदारीतत्त्वावरती या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणार  आहे  मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या पुनर्वसनासाठी  ८ हजार ४९८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे  मात्र या पुनर्विकासाला स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना पाहायला मिळत आहे  रहिवाशांना 300 चौरस फुटांच्या  ऐवजी 500 चौरस फुटांची घरं देण्यात यावी  आतापर्यंत सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही तरीही स्थानिकांना घर खाली करण्यासाठी दबाव टाकला जातोय  यासंदर्भात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू असतानाही हा प्रकल्प रेटण्याचा राज्य सरकार प्रयत्न करतय?  एमएमआरडीए ४८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे  रमाबाई आंबेडकर नगर हे ३१.८२ हेक्टर परिसरात पसरलेलं आहे  या प्रकल्पांतर्गत रमाबाई आंबेडकर नगरमधील जवळपास १६ हजार कुटुंबांना मोफत घरं दिली जाणार आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram