City Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट 18/10/2024

Continues below advertisement

City Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

अमित ठाकरेंना माहिममधून उमेदवारी देण्यासाठी मनसेच्या नेत्यांचा आग्रह, ठाकरे गटाचंही मनसेच्या निर्णयाकडं लक्ष, अमितला उमेदवारी दिल्यास ठाकरे गट बाय देण्याची शक्यता...

मुंबईसाठी टोलमुक्ती मिळाल्याने राज ठाकरेंचा ठाणेकरांकडून सत्कार, आनंदनगर टोलनाक्यावर जंगी कार्यक्रम

काँग्रेसनं जागांचा तिढा लवकर सोडवावा अशी संजय राऊतांची मागणी, राहुल गांधींनाही फोन लावणार, विदर्भातल्या काँग्रेसच्या जागांवर ठाकरे गटांचा दावा..

महायुतीमध्ये ९० टक्के जागांवर मतैक्य झालंय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, जात-पंथ-धर्म बघून उमेदवार ठरवत नाही असं स्पष्टीकरण..

भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील अजित पवारांच्या भेटीला, कवठे महांकाळ राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्यानं मुलाच्या उमेदवारीसाठी संजयकाकांचे प्रयत्न..

नवाब मलिक आणि सना मलिक दोघेही विधानसभा निवडणूक लढणार, नवाब मलिक शिवाजीनगर-मानखुर्दमधून तर सना मलिक अणुशक्तीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram