City 60 | सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

Continues below advertisement

City 60 | सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा नियोजीत पुणे दौरा रद्द. 

अजूनही ९० विधानसभा मतदारसंघांबाबत महायुतीमध्ये तिढा, याबाबत चर्चेसाठी महायुतीच्या नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक, तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार.

विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात महायुतीची लवकरच पुन्हा दिल्लीत बैठक होणार, छ. संभाजीनगरमधील शहांसोबतच्या बैठकीत जागा वाटपाबाबत तत्वतः चर्चा झाल्याची माहिती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा मुंबई दौरा, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शाह मुंबईत येणार, आशिष शेलार, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक.

संजय राऊत आज रात्री दिल्लीला रवाना होणार, तर उद्या सकाळी जागावाटपासंदर्भात काँग्रेसच्या काही  वरिष्ठ नेत्यांशी संजय राऊत भेटणार असल्याची माहिती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे १ हजार 200 इच्छूकांचे उमेदवारीसाठी अर्ज, मविआत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेच्या 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता. 

महाराष्ट्रात मी सिंघम की तू सिंघम अशी चढाओढ सुरू, अक्षय शिंदेच्या एन्कऊंटर नंतर लावण्यात आलेल्या बॅनरवरुन राऊतांचा टोला, तर  नालासोपाऱ्यात काल भाजप पदाधिकाऱ्याला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक, फडणवीस त्याला बेड्या घालणार का, राऊतांचा सवाल. 

 गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची विखेपाटलांवर टीका,  मतांसाठी दहशत ठेवण्याची वृत्ती बरोबर नसल्याचा थोरातांचा टोला.

काँग्रेसचे निलंबीत नेते नरेंद्र जिचकार यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची केली घोषणा,  पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram