City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा एका क्लिकवर : 13 June 2024

Continues below advertisement

बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी आज साडे अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणार, सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक, मनसेचे नेते,सरचिटणीस तसेच मुंबईतील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित. थोड्याच वेळात राज ठाकरे होणार उपस्थित.

विधान परिषदेच्या शिक्षक - पदवीधर मतदारसंघासाठी ५५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात, ३३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, चारही मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान. 

कोकण पदवीधर मतदार संघातील मविआचा तिढा सुटला, ठाकरे गटाचे किशोर जैन आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरै यांचा अर्ज मागे, मविआकडून काँग्रेसचे रमेश कीर आता रिंगणात. 

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली. पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा आज संध्याकाळी सात वाजता मुंबईतील रंग शारदा येथे मेळावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार राहणार उपस्थित.

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram