bajrang sonawane On Manoja Jarange : मनोज जरांगेंच्या पकृतीची काळजी करुन लवकर तोडगा काढावा
मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं असून सरकारला 1 महिन्यांचा अवधी दिला आहे. तसेच, पुढील 1 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उभारणार असल्याचेही जरांगे यांनी यावेळी केली. त्यानंतर, मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी ज्युस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं. दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा करताच अंतरवाली सराटीत जल्लोष आणि घोषणाबाजी करण्यात आली.आम्ही पाच महिने वेळ दिला त्यात 2 महिने आचारसंहितेमध्ये गेले आहेत. वाशीपासून आजपर्यंत 5 महिने दिले, पण सरकारने काही केलं नाही. आम्ही तुम्हाला 30 जूनपर्यंत मुदत देतो, पण त्यांनी 1 महिना मागितला आहे. आता तुम्हीच सांगा काय करायचे, असा प्रश्न जरांगे यांनी समोरील लोकांना विचारला. त्यानंतर, सरकारला 13 जुलैपर्यंत 1 महिन्याची मुदत देण्यात आली. तसेच, 1 महिन्याच्या आत सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर निवडणूक लढवणार. 1 महिना देण्यास आम्ही तयार, त्यानंतर काही म्हणू नका. वेळ आली तर विधानसभेला जागेवर सीट उभा नाही करणार, तर नावं घेऊन उमेदवार पाडणार, असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारमधील नेत्यांना दिला. मनोज जरांगेंच्या पकृतीची काळजी करुन सरकारने लवकर तोडगा काढावा, असं नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे म्हणाले.