City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha
१२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान काठमांडूतल्या कांतीपूरमध्ये माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक,महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाल्यास सरकारविरोधी वातावरण कसं तयार करायचं यावर बैठक मंथन झाल्याची माहिती...
काठमांडूचं कौतुक आरएसएसला खूप होतं, संजय राऊतांचा टोला, नेपाळमध्ये माओवाद्यांचा प्रभाव वाढला हे मोदींचं अपयश, राऊतांची टीका.
सत्तेत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस भारत जोडो यात्रेबाबत काहीही बोलतात, संजय राऊतांची टीका, निवृत्त लष्करी अधिकारी भारत जोडो यात्रेत होते,राऊतांचं वक्तव्य
स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळाची मागणी असतेच, संजय राऊतांचं वक्तव्य, मुंबई मनपावर उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू, मुंबई पालिका स्वबळावर लढण्याचे राऊतांकडून संकेत.
अधिवेशनानंतर विरोधी पक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद होणार, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर, सर्व आमदारांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आश्वासन.
अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होण्याची शक्यता,नाराजीनाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा, २३ तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज, सूत्रांची माहिती