City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 17 ऑगस्ट 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 17 ऑगस्ट 2024 : ABP Majha
हजारो महिलांच्या उपस्थितीत बालेवाडीमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यंत्र्यांसह निलम गोऱ्हे, आदिती तटकरे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि इतर नेते उपस्थित.
लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचं गायन, यावेळी लाडक्या बहिणींनी धरला गाण्यावर ठेका.
बालेवाडीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वप्निल कुसाळेचा सत्कार, कोल्हापूरच्या स्वप्निलनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पटकावलं कांस्य पदक.
योजना चालू ठेवायच्या की नाही, तुमच्या हातात, उपस्थित लाडक्या बहिणींना महायुतीच्या सरकारला पुन्हा निवडून देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन.
लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडक्या बहिणींना ग्वाही, १ कोटी ३ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याची अजित पवारांची माहिती.
लाडकी बहीण योजनेच्या उद्धाटन कार्यक्रमात आमदार रवी राणा, महेश शिंदेंना अजित पवारांनी मंचावरुन खडसावलं, या दोघांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचं केलं होतं वक्तव्य.