City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCity 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024 : ABP Majha
कथित कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची छगन भुजबळांना तंबी, सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावणार, भुजबळांना न्यायालयाचा इशारा.
चंद्रबाबू नायडू यांचा मी नाव ऐकत आहे ते जर त्यांना लोकसभेचे अध्यक्ष पद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलगू देशम चंद्रबाबू नायडूंचा पक्ष आणि नितेश कुमारचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफल्या केल्याशिवाय राहणार नाही
चंद्रकांत पाटलांनी येत्या जूनपासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती, मात्र ही घोषणा हवेत जिरली असून विद्यार्थिनींना शिक्षणासाठी फी भरावी लागतेय, चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये वाद होत असल्याचं समोर.
आज यूपीएससीची पूर्व परीक्षा होणार. लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षा उशीरानं.
आज महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार, अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशाच्या सीईटीच आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून निकाल पाहता येणार.