Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या
ऑपरेटरवर गुन्हा दाखल,दोघांवर अटकेची टांगती तलवार
राहुल गांधींकडून ईव्हीएमची 'ब्लॅक बॉक्स'शी तुलना, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून एक्स पोस्ट, मुंबई उत्तर पश्चिम
मतदारसंघाच्या निकालानंतर वायकरांवर आरोप
ईव्हीएम हॅक होण्याचा धोका कायम, त्यांचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, टेस्लाचा सीईओ एलन मस्कचं मत, तर भारतीय ईव्हीएम हॅक करणं अशक्य, माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर
((ईव्हीएम हॅक करणं शक्य-एलन मस्क))
कलिना भूखंड गैरव्यवहारप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची भुजबळांना तंबी, सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट
संदीप क्षीरसागर यांचे वडील आणि बंधू जयदत्त क्षीरसागरांसोबत एकाच मंचावर, जयदत्त क्षीरसागर कोणती
भूमिका घेणार याकडे लक्ष
ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच काय, बबनराव तायवाडेंचा उपोषणकर्त्या हाकेंना सवाल, तर ओबीसी आरक्षणला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार ... प्रकाश शेंडगेंचा इशारा
शीना बोराचे अवशेष गहाळ होणं अतिशय धक्कादायक, आरोपी इंद्राणी मुखर्जीची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया
((मी निर्दोष आहे-इंद्राणी मुखर्जी))
सलमान खानला युट्यूबवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला राजस्थानमधून अटक, बिष्णोई गँगशी संबधित बनवारीलाल गुज्जरला मुंबई गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या
एक जूनपासून मुलींना राज्यात मोफत शिक्षण देण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच विरली, जून महिना सरला तरी अंमलबजावणी नाहीच
एसटीचा पास आता थेट शाळेत मिळणार, पास केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहण्याचा त्रास टळणार
((एसटीचा पास थेट शाळेत मिळणार!))
शिर्डीतील साईबाबांना ४३ लाखांचा सोन्याचा मुकूट अर्पण, देणगीदाराकडून नाव जाहीर न करण्याची संस्थानाला विनंती
((साईंच्या चरणी ४३ लाखांचा मुकुट))
गजानन महाराजांच्या पालखीचा सध्या अकोल्यात मुक्काम, पुढच्या प्रवासासाठी उद्या सकाळी मार्गस्थ होणार
((गजानन महाराजांच्या पालखीचा अकोल्यात मुक्काम ))