City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, अपघातात कॅप्टन गिरीश पिल्लई, परमजित सिंग आणि इंजिनिअर प्रीतम भारद्वाज यांचा मृत्यू.
मुंबईत जुहूच्या दिशेने जात असताना धुक्यामुळे डोंगराळ परिसरात होलिकॉप्टरचा अपघात, ऑक्स्फर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून झालं होतं उड्डाण, हेरिटेज एविएशन कंपनीचं आणि ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीचं हेलिकॉप्टर असल्याची माहिती.
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना घेऊन रायगडला जाणार होतं, मुंबईतून रायगडमधील सुतारवाडीत आपल्या घरी तटकरे जाणार होते, मात्र मुंबईत पोहोचण्यापूर्वीच हेलिकॉप्टरचा अपघात.
हेलिकॉप्टरचा अपघात ही दुर्दैवी आणि वेदनादायक घटना, डोंगराळ भाग असल्यानं हेलिकॉप्टर चालवणं अवघड, हवाई वाहतूक मंत्रालयाला सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी पत्र लिहिणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.
जागावाटपाबाबत महायुतीच्या वरिष्ठांची शाहांसोबत बैठक, अजित पवार, सुनिल तटकरे, गणेश नाईक तसंच आशिष शेलार यांची उपस्थिती, तिढा असलसेल्या जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न.
जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीची आज सलग तिसऱ्या दिवशी बैठक, शिवालयमध्ये आज दुपारी बैठक, आतापर्यंत 150हून अधिक जागांवर एकमत, मुंबईतील जागावाटपा संदर्भात स्वतंत्र समिती.