'या' दोन्ही सरकारच्या काळात कर्जमाफी झालीच नाही; उद्विग्न शेतकऱ्याने शेतात लावला मोठा फ्लेक्स
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी नीलकंठ लिपते यांनी आपल्या शेताच्या बांधावर लावलेल्या फ्लेक्सची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. नीलकंठ हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची भिलखेड येथे 2 एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र संग्रामपूर शाखेचं 2011 पासून एक लाख 48 हजाराचं कर्ज आहे. यापूर्वी त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफी साठी अर्ज केला होता व आताही वर्तमान ठाकरे सरकारच्या काळातील कर्जमाफी व शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज केला होता पण दोन्ही सरकारच्या काळात त्याना कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या शेतातील बांधावर मोठा फ्लेक्स लावलाय. त्यावर "फसवी कर्जमाफी" तसंच " या दोन्ही सरकारच्या काळात मला कर्जमाफी झालीच नाही" असा उल्लेख करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटोही लावले आहेत. .या भिलखेड गावात जवळपास 60 टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नसल्याचं गावातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Continues below advertisement