Unlock 5.0 | मुंबईत आजपासून मोनो रुळावर तर उद्या मेट्रो धावणार
लॉकडाऊननंतर आजपासून मोनोचा सर्वसामान्यांसाठी प्रवास खुला होतोय तर मुंबई मेट्रोचा प्रवास उद्या 19 ऑक्टोबर पासून सुरु होईल. मात्र अद्याप सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, मुंबईकरांची प्रतिक्षा काही अंशी तरी लवकरच संपणार आहे. लोकल प्रवासाची लिटमस टेस्ट असणारी मेट्रो 19 तारखेपासून तर मोनो उद्यापासूनच सर्वसामान्यांसाठी रुळावर येतेय. मात्र, त्याकरता मोनो आणि मेट्रो प्रशासनानं कडक नियमावलीही जारी केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनंतरचा सार्वजनिक वाहतूकीचा प्रवास आता पूर्वीसारखा नसेल हे नक्की.