
BMC Corona : रुग्ण कमी झाले नाहीत तर निर्बंध आणखी वाढवणार, सुरेश काकाणींचा इशारा
Continues below advertisement
मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने (Corona Virus) संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून भारतातही या महामारीने धुमाकूळ घातला आहे. त्यात देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्येही कोरोनाने (Mumbai Corona) बरंच नुकसान केलं आहे. अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे, असे वाटत असताना ओमायक्रॉनच्या (Omicron) एन्ट्रीनंतर आता कोरोना रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. दरम्यान रुग्णवाढीचा दर आणि रुग्ण दुपटीचा दरही चिंताजनक असल्याने मुंबईकरांना आता अधिक काळजी घेण्याची वेळ आली आहे.
Continues below advertisement