Aurangabad : औरंगाबादच्या पैठणमधील झालेलं धर्मांतर खोटं, Alpha Omega Christian Mahasangh चा आरोप
Continues below advertisement
ऐन ख्रिसमस सणाच्या काळात जालना जिल्ह्यातल्या मंठामधील 53 ख्रिस्ती बांधवांनी हिंदू धर्म स्वीकारलाय. औरंगाबादच्या पैठणमधील नाथमंदिरात 12 कुटुंबांचा हा धर्मांतर सोहळा पार पडला. धर्मजागरण विभाग आणि नाथवंशज यांच्या उपस्थीतीत हा सोहळा पार पडला. ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला होता.. तर पैठणमध्ये वेदशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या पंडितांनी हिंदु धर्मशास्रानुसार या सोहळ्याचं पौरोहित्य केलं. या सर्व 53 जणांनी स्वेच्छेनं धर्मांतर केल्याची माहिती आहे. आणि त्यामुळेच धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आलं होतं असं कळतंय.
Continues below advertisement