Beed : प्रीतम मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने बीडमधील भाजप सदस्यांचा राजीनामा
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड
Updated at:
10 Jul 2021 05:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय मंत्रिमंडळामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये भाजपचे पदाधिकारी नाराज झाले आहेत आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात आता राजीनामासत्र सुरू झालं आहे. आज भाजप गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सविता बडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा बीडच्या जिल्हाध्यक्षकडे सुपूर्द केला आहे ज्या ठिकाणी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना मान-सन्मान मिळत नसेल तर या पदावर राहून काय उपयोग अशी देखील उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे त्यामुळे आपण हा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितलंय.