Batmyancha Ardhashatak | राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | ABP Majha | 04 सप्टेंबर 2024 | 12 Noon

Continues below advertisement

Batmyancha Ardhashatak | राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | ABP Majha | 04 सप्टेंबर 2024 | 12 Noon

राहुल गांधींनी घेतली दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांच्या कुटुंबीयांची भेट, नांदेडच्या नायगावात जाऊन राहुल गांधींनी केलं  कुटुंबीयांचं सांत्वन 

सांगलीच्या कडेगावात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण, शरद पवारांसह अनेक नेते हजर राहणार 

कडेगाव येथील राहुल गांधी यांच्या दौऱ्यात राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा, लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 

मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधील घरातून पोलिसांनी घेतलं ताब्यात, जयदीप आपटे १० दिवसांपासून होता फरार. 

जयदीप आपटेला अटक करुन सिंधुदुर्ग पोलीस मालवणमध्ये दाखल, थोड्याच वेळात कोर्टात हजर करुन रिमांड मागणार.. 

शिवभक्तांच्या दबावामुळे जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत, संजय राऊतांची टीका. तर जयदीप आपटेच्या जामिनाची सूत्र ठाण्यातून हलतात, राऊतांचा आरोप. 

जयदीप आपटे सरकारचा नातेवाईक, आपटेला जामीन देण्यासाठी प्रयत्न सुरु, जयंत पाटलांची टीका. 

शिवरायांचा अपमान, बदलापूर  अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली मागणी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram