Badlapur Crime News : पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज; बादलापुरातील परिस्थितीचा आढावा

Badlapur Crime News : पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज; बादलापुरातील परिस्थितीचा आढावा

ही बातमी पण वाचा

Kisan Kathore on Badlapur Case : आंदोलक बदलापूरचे रहिवासी नाहीत, ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी; भाजप आमदाराचा दावा

Kisan Kathore on Badlapur Case : बदलापूरमध्ये  चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान आज सकाळपासून रेल्वे स्थानकावर बदलापूरसह अनेक भागातील लोकांनी रेल्वे रोको केलाय. अजूनही बदलापूर रेल्वे स्थानकावरिल परिस्थिती जैसे थे आहे. पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आंदोलक रेल्वे स्थानकावरुन हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. आजूबाजूच्या शहरातील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजप आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

किसन कथोरे काय काय म्हणाले? 

किसन कथोरे म्हणाले, सकाळी आंदोलन भरटकलं. शाळा बाजूला राहिली आणि रेल्वेमध्ये घुसले. रेल्वेमध्ये घुसलेले आरोपी बदलापूरचे राहिवासी नाहीत. सगळी बाहेरुन आलेली मंडळी आहे. शाळेतील वातावरण आता शांत झालं आहे. शाळेतील मुख्याध्यापकावर कारवाई झाली. कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. संस्थाचालकांची चौकशी सुरु केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. बदलापूरकरांना आज वेठीस धरण्यात आलं आहे. हे योग्य नाही. सर्वांना माझी विनंती आहे, शांतता राखावी. या प्रकरणाचे कोणीही राजकारण करु नये. स्वत: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आदेश दिले असतील. नागरिकांनी संयम पाळला होता. बाहेरुन आलेल्या मंडळींनी रात्रीत बॅनर तयार केले आणि बदलापूरमध्ये लागले. लाडकी बहीणचं मानधन देऊ नये, आम्हाला न्याय द्यावा. हे बॅनर उल्हासनगर वगैरे भागातून आले. हे कोणीतरी ठरवून केलं. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola