Bachchu Kadu Mumbai : मला मंत्रिपद दिलं तरी घेणार नाही, 20 जागा लढण्यावर बच्चू कडू ठाम
abp majha web team
Updated at:
13 Jun 2024 06:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. महायुतीचे घटक असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. बच्चू कडू महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत 20 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे. बच्चू कडू हे महायुतीत नाराज असल्याची देखील चर्चा रंगली आहे. बच्चू कडू यांनी विधानसभेला एकला चलो चा... नारा दिला आहे. विधानसभेसाठी 20 जागा लढवणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू महायुतीतून निवडणूक लढवणार नाहीत अशी देखील चर्चा आहे. नागपूरमध्ये ते बोलत होते. बैठकीमध्ये विधानसभेबाबत निर्णय होणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत.