Ayodhya Hanuman Kadai : 2 हजार किलोंची हनुमान कढई, 7 हजार किलोचा शिरा तयार होणार : ABP Majha

Continues below advertisement

15 हजार लिटर क्षमता असलेली आणि 2 हजार किलो वजनाची देशातील सर्वात मोठी कढई नागपूरमध्ये तयार झालीये.. आणि ही कढई अयोध्येला जाण्यास सज्ज झालीये... प्रसिद्ध शेफ  विष्णू मनोहर यांनी हि कढई तयार करून घेतली असून आकारामुळे या कढईला  हनुमान कढई असे नाव देण्यात आलंय. राम मंदिर उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर विष्णू मनोहर हि कढई अयोध्येला घेऊन जाणार आहेत. 28 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान या कढईत एकाच वेळी 7 हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा तयार केला जाणार आहे... दरम्यान हा प्रसाद प्रभू रामाच्या चरणी अर्पण करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram