Amruta Fadnavis : Devendra Fadnavis सहाव्यांदा फाॅर्म भरताहेत त्यांना नक्कीच यश मिळेल

Continues below advertisement

Amruta Fadnavis : Devendra Fadnavis   सहाव्यांदा फाॅर्म भरताहेत त्यांना नक्कीच यश मिळेल

राज्यात आज अनेक मातब्बर नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. अशातच राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकातून ते आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढणार आहेत. त्यानंतर ते तहसील कार्यालयात जात आपला अर्ज सादर करणार आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरी जात आशीर्वाद घेतले आणि यावेळी त्यांचे गडकरी कुटुंबीयांकडून औक्षण देखील करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यंदा सलग सहाव्यादा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मात्र 2024 ची निवडणूक देवेंद्र फडणवीसांसाठी मोठे आव्हान देणारी असल्याचे बोलले जात आहे.  नितीन गडकरींचा आशीर्वाद घेत कुटुंबीयांकडून औक्षण  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोषित होताच "शंखनाद" हा एक शब्द ट्विट केला होता. दरम्यान आज ते नामांकन अर्ज भरण्यासाठी जात असताना प्रचार रथावर तोच शंखनाद शब्द लिहिलेला आहे. "भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे" अशा स्लोगनसह हा रथ तयार करण्यात आला आहे. आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकातून देवेंद्र फडणवीस आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढणार आणि त्यानंतर तहसील कार्यालयात अर्ज सादर करणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीस हे तिघे एका गाडीतून निघाले आहे. यापूर्वी गडकरी दंपति आणि फडणवीस दंपत्ती मध्ये नागपूर संदर्भात मनमोकळी चर्चा झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram