Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका

Amruta Fadnavis, नागपूर : "लाडकी बहीण योजना एकदम हिट झालेली योजना आहे. मी बऱ्याच दिवसांनी ईथे आले माञ तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही फार आनंदी दिसतं आहात. अनेक योजना तुम्हाला मिळत आहेत, माहिती नसेल तर माहिती करून फायदा करून घ्या. नागपुरात मोठा विकास झाल्याने आज नागपुरात अनेकांची येण्याची इच्छा आबे, देशात मोदीला निवडूण आणलं तसच महाराष्ट्रात भाजपला निवडूण आणणे गरजेचे आहे", असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. 

उपमुख्यमंत्री फडणीसांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका 

मोठा नेता माझ कुटुंब माझी जबाबदारी म्हणू शकत नाही, त्यामुळे मी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आहे आणि ते जनतेची कामे करतात, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तुम्हाला आता कंबर कसून बाहेर पडायचं आहे.नोव्हेंबरमध्ये आपल्याला आपल्या भागात सर्वाधिक मतदान झाले पाहिजे.  आपल्या मुलीला पॉवर मध्ये किंवा मुख्यमंत्री बनवायचं असे आपल्यात कोणी नेते नाहीत, असा टोलाही फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola