Amruta Fadnavis case : खळबळजनक! अमृता फडणवीसांना फसवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील दिग्गज नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न झालाय. अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आलीय. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. फॅशन डिझायनर असल्याचं सांगत, अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली, पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचं सांगत मदत करण्याची मागणी केली. त्याबदल्यात एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्नही केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. अमृता फडणवीस यांनी तक्रार केल्यानंतर अनिक्षाला अटक करण्यात आली. बुकी अनिल जयसिंघानी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेतायत. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola