Ramesh Patil BJP MLA : आमच्याकडे निरमा पावडर, येणाऱ्यांना स्वच्छ करतो : रमेश पाटील
भाजप आमदार रमेश पाटील यांनी काल विधान परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलंय. आमच्याकडे गुजरातहून निर्मा पावडर येतं. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो, असं वक्तव्य रमेश पाटील यांनी केलंय. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर भाष्य करताना रमेश पाटील यांनी हे वक्तव्य केलंय.