Amravati नागरिकांकडून Corona नियमांची पायमल्ली, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठेत गर्दी
राज्यात अनलॉक झाल्याने अनेक जिल्ह्यात आता नागरिकांकडून कोरोनाचे नियम पाळतांना पाहायला मिळत नाहीय. अमरावती जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. अमरावतीच्या बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मुख्य बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळत आहे. अनेक जण तर आता विनामास्क नागरिक रस्त्यावर आणि बसस्थानकवर दिसतायत. अमरावती बसस्थानकवर सकाळपासून प्रवासांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. एखादी बस आली की त्यावर अक्षरशः प्रवासी तुटून पडताय. 40 ते 50 जण एकत्र गर्दी करून बसमध्ये चढतांना दिसतात. त्यातला त्यात अनेक प्रवासी तर चक्क विनामास्क प्रवासी दिसतंय.