ABP Majha Headlines : 01:00PM : 20 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या कोठडीत वाढ, सत्र न्यायालयाकडून २६ ऑगस्टपर्यंत कोठडी, आरोपीचं वकीलपत्र घेण्यास कल्याणमधील वकिलांचा नकार

बदलापूर आंदोलनातील २२ आरोपींना न्यायालयीन कोठडी, रेल्वे कोर्टात आंदोलकांना केलं सादर, अजामीनपात्र कलमं मागे घेण्याची वकिलांची आक्रमक मागणी

बदलापूरचा आक्रोश राजकीय हेतूनं प्रेरित, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप, आंदोलनासाठी गाड्या भरभरुन आणल्याचा शिंदेंचा दावा

पॉक्सो कायद्यात अधिनियम करावे लागतील, प्रलंबित शक्ती विधेयकाचं कायद्यात रूपांतर करा, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकमांची मागणाी, एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह संवाद

बदलापूरप्रकरणी उज्वल निकमांच्या वकील म्हणून नेमणुकीला विरोधीपक्ष नेेते विजय वडेट्टीवारांचा आक्षेप, शिक्षण संस्था आणि वकील एकाच पक्षाशी संबंधित असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप

बदलापूर आंदोलनानंतर सरकारला जाग, प्रत्येक शैक्षणिक संस्थेत एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमण्याचे, मंगलप्रभात लोढांचे आदेश, सुरक्षारक्षक, चालक, वाहकांची पडताळणी करण्याचेही आदेश

बदलापूरकरांच्या आक्रोशाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्या सरकारवर मनोज जरांगेंची टीका, सरकार नालायक असल्याचा जरांगेकडून पुनरुच्चार

निवडणूक लढवण्याविषयी दोन महिन्यात निर्णय घेणार, मनोज जरांगेची स्पष्टोक्ती.. सरकार निवडणुका लांबवत असल्याने २९ ऑगस्टची बैठक होणार नसल्याचा जरांगेचा दावा 

भाजपकडून धैर्यशील पाटील, तर राष्ट्रवादीकडून नितीन पाटलांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल, धैर्यशील पाटलांचा अर्ज भरण्यासाठी फडणवीसही उपस्थित

भाजपच्या समरजित घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित, २३ ऑगस्टला बोलावला कार्यकर्ता मेळावा, उद्याच्या महायुतीच्या जाहीर सभेकडेही घाटगेंची पाठ

देशभरातल्या विरोधी पक्षांसह दलित संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणबाबतच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

राज्यात आज आदिवासी संघटनांकडून बंदची हाक, पेसा भरतीवरील स्थगिती उठवण्याची मागणी, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात आंदोलनाचे पडसाद उमटणार

पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, २९ ऑगस्टपर्यंत अटेकपासून संरक्षण, युपीएसीचा अटकपूर्व जामीनला विरोध कायम

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर, राज ठाकरे गोंदियात दाखल, दुपारी दीड वाजता पदाधिकाऱ्यांशी बैठक, संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्यात

शरद पवारच आंदोलक मनोज जरांगेच्या पाठीशी असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यालाही पवारांचा पाठिंबा असल्याचाही आंबेडकरांचा दावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram