Ajit Pawar Meet Jayant Patil : अजित पवार - जयंत पाटलांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.यासाठी मतदान सुरु आहे. आमदारांकडून मतदान सुरु असताना संजय राऊत (Sanjay Raut) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी हस्तोंदलन केलं. यानंतर संजय राऊत आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट झाली. चंद्रकांत पाटील यांनी माघारी येऊन संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी अरे व्वा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे एकमेकांनी असं म्हटलं. मात्र, हा संवाद राजकीय नव्हता, चहा पिण्यासाठी एकत्र येऊया, असं म्हणायचं होतं, असं संजय राऊत म्हणाले. माझी लाईन कधीही चुकत नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी होतील. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, आमचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे उमेदवार विजयी होतील, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात आम्ही दिल्लीत मोदींना भेटतो, अमित शाह लॉबीत भेटतात. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. आमचे त्यांचं व्यक्तिगत भांडण नाही. ते वैचारिक भांडण आहे.