ABP Majha Headlines 6PM एबीपी माझा हेडलाईन्स 7 AM 15 July 2024 Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट, दोन्ही जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.
दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेला फटका... मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या १२ ते १३ तासांपासून रखडल्या
चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीचं पाणी शिरलं, प्रशासन अलर्ट मोडवर, NDRFची टीम तैनात
((चिपळूणमध्ये पाणी साचण्यास सुरुवात ))
बारामतीतून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत, छगन भुजबळांचा शरद पवारांवर थेट आरोप...भुजबळांकडे पुरावा काय, सुप्रिया सुळेंचा सवाल...
मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी फडणवीसांचा दबाव, जरांगेंचा आरोप...जरांगेंनी गैरसमज करू नये, शंभूराज देसाईंचं आवाहन...
पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचे पंकजा मुंडेंसोबत संबंधांची चर्चा, मनोरमा खेडकरांची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला देणगी दिल्याचं समोर, पंकजांच्या उमेदवारीसाठी दिलीप खेडकरांकडून मोहटा देवीला मुकुट अपर्ण
स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं सलग दुसऱ्यांदा जिंकला विम्बल्डनचा खिताब, सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६नं पराभव
((स्पेनचा अल्कराज ठरला टेनिसचा सरताज))