Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 एप्रिल 2021 | गुरुवार | ABP Majha
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 एप्रिल 2021 | गुरुवार | ABP Majha
1. आजपासून देशभरात 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात, कोणतीही भीती न बाळगता लस घेण्याचं आवाहन
2. राज्यात कोरोना चाचणीच्या दरात आणखी कपात, 500 रुपयांत होणार टेस्ट, आरोग्यमंत्री राजशे टोपे यांची माहिती
3. बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून मागे, बचत योजनांवरील व्याज दर जैसे थेच ठेवणार, केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांचं ट्वीट
4. आजपासून घर खरेदीसाठी 5 टक्के स्टॅम्प ड्युटी, विलिनीकरण होणाऱ्या सात बँकांसाठी नवीन चेकबुक आवश्यक, करदात्यांसाठीचे नवीन नियमही लागू
5. पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ; आयकर विभागाचा निर्णय, या काळात लिंक न केल्यास दंड भरावा लागणार
6. नाशिककरांना बाजारात जाण्यासाठी 5 रुपयांची पावती फाडावी लागणार नाही, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पोलीस आयुक्तांचा निर्णय
7. आठ वर्षांपासून काम रखडलेल्या पुणे-सातारा महामार्गासाठी 5 टक्के जादा टोलवसुलीला परवानगी, वाहनचालकांचा संताप
8. सचिन वाझेनंतर विनायक शिंदेची डायरीही एनआयएएच्या हाती, वाझेची अनेक गुपितं उघड होण्याची शक्यता
9. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, पश्चिम बंगालमध्ये 30 तर आसाममध्ये 39 जागांसाठी मतदान
10. फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट; राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा