Aadhar Pan card link : आधारकार्ड - पॅनकार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ
Continues below advertisement
मुंबई : Pan Card आणि Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आल्याचं ट्वीट आयकर विभागाने केलं आहे. आता 30 एप्रिल 2021 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आयकर विभागाच्या साईटवर अनेकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली.
Continues below advertisement