ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 19 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 19 April 2025
निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा मोठा तणाव...भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी अतुल सावेंना पत्र लिहित मंजूर केलेली काम रद्द करण्याची केली मागणी...
हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन...मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी...मराठी जागर परिषद भरवण्याचे राज ठाकरेंचे आदेश..
राज्यात विकास कामांसाठी पाच लाख झाडांची कत्तल होणार, आदित्य ठाकरेंचा आरोप, भाजप महाराष्ट्राचं वाळवंट करणार अशी टीका..मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरुच ठेवण्याचा इशारा...
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकरांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या...वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ...आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट.
पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मेहूल चोक्सी भारतीय आहे का?, उच्च न्यायालयाची ईडीला विचारणा...भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश..
बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी...अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल...बडतर्फीचीही कारवाई...
तनिषा भिसेंना चार ते पाच दिवस इंदिरा आयव्हीएफमध्येच ठेवणं चुकीचं होतं, ससून रुग्णालयाच्या चौकशीत महत्त्वाचा निष्कर्ष...भिसे कुटुंबीयासह इंदिरा आयव्हीएफवर ठपका...