Dharashiv Farmer grand wedding : वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीला सून केल्यानंतर हेलीकॉप्टरने मिरवणूक
Dharashiv Farmer grand wedding : वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीला सून केल्यानंतर हेलीकॉप्टरने मिरवणूक
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अंतरवली येथील भास्कर शिकेतोड या शेतकऱ्याने मुलगा आणि सुनेची लग्नाची मिरवणूक थेट हेलीकॉप्टरने काढली आहे. भास्कर शिकेतोड हे शेती करतात त्यासोबत त्यांचा हार्डवेअर चा व्यावसाय देखील आहे . छोटा मुलगा आकाश आणी सून अस्मीताच्या लग्नाची परगाना मिरवणूक थेट हेलीकॉप्टरने काढण्यात आली . शिकेतोड यांना दोन मुल आहेत. दोन्ही सुनांचे त्यांनी असच ग्रँड वेलकम केलं. भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटारसायकलवरुन काढण्यात आली होती त्यांनंतर त्यांनी शेती आणी व्यावसायाच्या माध्यमातुन चांगले उत्पन्न मिळवले आणी ठरवलं की मुलांच्या लग्नात हेलीकॉप्टरने मिरवणूक काढायची आणी त्यांनी हेलीकॉप्टरने मिरवणूक काढली आहे .भास्कर शिकेतोड यांचं स्वप्न होतं की मूलांच्या लग्नाची मिरवणूक हेलीकॉप्टरमधुन काढायची आत्तापर्यंत त्यांनी दोन्ही मुलांच्या लग्नाची मिरवणूक हेलीकॉप्टरमधुन काढली.