ABP Majha Headlines 9 PM 15 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines 9 PM 15 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्रिपदाचं मला स्वप्न पडत नाही, सीएमचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या ठाकरेंचं शिर्डीत वक्तव्य, तर ठाकरेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, राऊतांचा पुनरुच्चार
विरोधकांनी दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर धुडकावली, गडकरींचा गौप्यस्फोट, भूमिकेशी तडजोड न करणारे गडकरी पंतप्रधान हवेत, अनेक विरोधकांची भूमिका
बहिणींना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर ठाकरेंकडूनही लाडकी बहीण योजनवरून समाचार
जुन्या पेन्शनऐवजी नव्या पेन्शन योजनेचं समर्थन करणाऱ्या केसरकरांविरोधात घोषणावाजी, शिर्डीमधल्या अधिवेशनात गोंधळ, तर ठाकरेंकडून जुन्या पेन्शनचं आश्वासन
तीन वर्षापूर्वीच्या गोळीबारप्रकरणी नाशकातले ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा..खोटे आरोप करुन मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, बडगुजरांचा पलटवार
विधानसभेआधी भाजपला धक्के बसण्याचे संकेत, धुळ्यात भाजप आमदार अमरीश पटेलांकडून पवारांचं स्वागत, तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावितांचे भाऊ राजेंद्र गावित बंडखोरीच्या पवित्र्यात